जागर आंदोलन करणार्‍या दहा मराठा समन्वयकांवर गुन्हा दाखल

Foto
 मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी क्रांतिचौकात मशाली पेटवून जागर गोंधळ आंदोलन करणार्‍या 10 मराठा आंदोलकांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर चव्हाण, ज्ञानेश्वर आसाराम गायकवाड, संजय रामभाऊ सावंत, सुनिल विठ्ठलराव काठेकर, निलेश गुलाराव ढवळे, प्रकाश नारायण हेंडगे, रविंद्र भानुदास काळे, देवीदास रमेश क्षीरसागर, कृष्णा मारोती ठोंबरे, नंदु अशोक गरड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांची नावे आहेत. महाआघाडी स्थापन झाल्यापासून अनेक वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनेक मंत्र्यांना भेटून  व आंदोलनाद्वारे मागणी मान्य करण्याचे निवेदन करण्यात आले मात्र राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत मराठा समन्वयक यांनी सोमवारी क्रांतीचौक उड्डाणपुला खाली क्रांतीची मशाल पेटवत जागरण गोंधळ आंदोलन केले होते. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उलनघन केल्या प्रकरणी 10 पदाधिकारी कार्यकर्त्यांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.